शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन चुकीचे : माधव गोडबोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:24 IST

सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देकायद्याविरोधात जाण्याचा चुकीचा पायंडा चीट फंड घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी मोठमोठे राजकीय नेते देखील गुंतलेले असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलीस याप्रकरणी चौकशी करत नसल्याने काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

पुणे : पश्चिम बंगालमधील चीट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सीबीआयच्या कारवाई विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले. हा अत्यंत चुकीचा प्रकार असल्याचे परखड मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अशा घटनांमुळे देशात कायद्याच राज्य आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये काही वर्षांपुर्वी झालेल्या शारदा आणि रोझ व्हॅली या घोटाळ्याप्रकरणी स्थानिक पोलीस आयुक्तांचा जबाब नोंदविण्यासाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कारवाई विरोधात धरणे आंदोलन करीत असल्याचे जाहीर केले. देशाची संघीय रचना मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  त्या पार्श्वभूमीवर बोलताना गोडबोले म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे वर्तन अतिशय चुकीचे आहे. सीबीआय ही केंद्रीय संस्था आहे. तिचा अधिकार हा केंद्रीय प्रदेशांपुरताच मर्यादित आहे. सीबीआयला एखाद्या स्थानिक गुन्ह्याची चौकशी करायची असल्यास, संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असते. मात्र, संंबंधित चीट फंड घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असून, त्यात मोठमोठे राजकीय नेते देखील गुंतलेले असल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक पोलीस या प्रकरणी चौकशी करीत नसल्याने काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सीबीआय टाळू शकत नाही. आपण संघ राज्य आहोत. जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच सीबीआयच्या कारवाई विरोधात धरणे धरत असेल, तर कसे चालेल. या पुर्वी देखील दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलन केले होते. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अशा पद्धतीने वागत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे. हे कायद्याचे राज्य आहे. अशा प्रकरणाला देखील राजकीय रंग दिला जातो. या पद्धती विरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला हवी. मात्र, आजकाल विरोधात असल्यावर सीबीआय सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याची ओरड केली जाते. फक्त आपण कोणत्या बाकावर आहोत, हे पाहून राजकीय व्यक्ती प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत असल्याचे गोडबोले म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार