प्रत्युषाची आत्महत्या नव्हे तर सुनियोजित हत्या - अजाज खानचा आरोप

By admin | Published: April 2, 2016 08:53 AM2016-04-02T08:53:19+5:302016-04-02T08:53:44+5:30

प्रत्युषा ब२नर्जीचा मृत्यू ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप अभिनेता अजाज खानने केला आहे.

Well planned murder, not suicide - Ajaz Khan's charge | प्रत्युषाची आत्महत्या नव्हे तर सुनियोजित हत्या - अजाज खानचा आरोप

प्रत्युषाची आत्महत्या नव्हे तर सुनियोजित हत्या - अजाज खानचा आरोप

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बालिका वधू मालिकाफेम प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूमुळे टीव्ही कलाकारांना मोठा धक्का बसला सहकलाकारांनी तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मात्र तिने आत्महत्या केली यावर अद्याप कोणाचाच विश्वास बसला नसून तिच्यासारखी खंबीर मुलगी असे पाऊल उचलणार नाही, असेच अनेकांचे म्हणणे आहे. 
प्रत्युषाचा सहकलाकार आणि अभिनेता अजाज खाननेही असेच मत व्यक्त केले असून ' प्रत्युषाचा मृत्यू ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या आहे' असा दावा त्याने केला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्रानेही तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच तिच्यासारखी खंबीर मुलगी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. 
शुक्रवारी संध्याकाळी गोरेगावमधील राहत्या घरी प्रत्युषाने गळफास लाऊन आत्महत्या केली. तिला उपचारांसाठी तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. प्रियकरासोबत सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.
बालिका वधू मालिकेनंतर प्रत्युषा नावारुपाला आली होती त्यानंतर बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
 

Web Title: Well planned murder, not suicide - Ajaz Khan's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.