संत गजानन महाराजांच्या पालखीचे मातृतिर्थ नगरीत स्वागत
By Admin | Updated: August 1, 2016 21:13 IST2016-08-01T21:13:39+5:302016-08-01T21:13:39+5:30
ब्रम्हांडनायक श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी आगमन होताच शेकडो भाविकांनी श्रींच्या नावाचा जयघोष करीत पालखीचे १ आॅगस्ट

संत गजानन महाराजांच्या पालखीचे मातृतिर्थ नगरीत स्वागत
- ठिकठिकाणी पालखीचे स्वागत:हजारो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
सिंदखेडराजा (बुलडाणा): ब्रम्हांडनायक श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी आगमन होताच शेकडो भाविकांनी श्रींच्या नावाचा जयघोष करीत पालखीचे १ आॅगस्ट रोजी स्वागत केले. टाळ मृदंगासह खांद्यावर
पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी जिल्ह्यात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केला.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथील विठ्ठल पांडूरंग माऊलीचे दर्शन घेऊन श्रींची पालखी परतीला निघाली. १ आॅगस्ट रोजी पालखीचे नाव्हा मार्गे विदर्भाचे प्रवेशद्वार असेल्या माळसावरगाव घाटातील मुक्तधाम मंदिराजवळ येताच दिंडीतील वारकारी ह्यह्यगण गण गणात बोतेह्णह्ण च्या जयघोषात बँडपथक व टाळमृदंगाच्या तालावर बेधुंद होऊन नाचले. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा सौ.नंदाताई कायंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, काँग्रेस जिल्हा चिटणीस जगन ठाकरे यांनी स्वागत पालखी व वारकऱ्यांचे स्वागत केले.
माळसावरगाव येथे दिंडीतील वारकऱ्यांनी चहा, नाश्ता घेवून नशिराबाद, तुळजापूर, अंचली, डावरगाव, धांदरवाडी, वसंतनगर, नाईकनगर, शेलू, भोसा, दरेगाव मार्गे मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीत आगमन झाले. यावेळी शहरातील भजनी मंडळीसह वारकरी व भावीकांनी शहरातून शोभायात्रा काढली. यावेळी ठाणेदार जाधव, तहसिलदार सुरडकर, बीडीओ जाधव यांनी वारकऱ्यांना चहा नाश्ता देऊन श्रींचे पूजन केले. नंतर दिंडी रामेश्वर मंदिराकडे रवाना झाली.
यावेळी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येवून भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. गावात ठिकठिकाणी महिलांनी सडा, समार्जन, रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. रामेश्वर मंदिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष तुळशिराम जामदार, देविदास ठाकरे यांनी समितीच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर जिजामाता
विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष बाळाजी तायडे, प्राचार्य सुरेश तायडे यांनी विद्यालयामध्ये सर्व वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करुन दिली. जिल्ह्यात आज श्रींच्या पालखीचे आगमन होणार असल्यामुळे जिल्ह्याच्या सिमेपासून तर सिंदखेडराजा पर्यंत भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. पोलिसांनी माळ सावरगाव पासून सिंदखेडराजापर्यंत चोख बंदोबस्त
ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)