शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सुशांत प्रकरणी SM रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे स्वागत - सचिन सावंत

By ravalnath.patil | Published: October 06, 2020 1:54 PM

Sachin Sawant : मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मुंबई पोलिसांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी स्वागत केले असून लवकरच या SM रॅकेटचा छडा लावला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मिडिया रॅकेट विरोधी मुंबई पोलिसांच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. लवकरच या बनावट सोशल अकाउंट्सचा खुलासा करू, ज्याला भाजपाचा IT विभागाने बनवले आहे. ज्यांचा उद्देश हा महाराष्ट्राला बदनाम करणे होता." असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आले. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे, अशी माहिती सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाऊंट्ससायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल ८० हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे. पण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लगेचच १४ जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेली असे अहवाल म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तपास करण्याचे आदेश सायबर सेलला दिले होते. त्यानुसार सध्या दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारीSachin sawantसचिन सावंतSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत