डहाणू-अंधेरी लोकलचे पालघरला स्वागत

By Admin | Updated: September 20, 2016 03:32 IST2016-09-20T03:32:50+5:302016-09-20T03:32:50+5:30

आज पासून सुरु झालेल्या डहाणू अंधेरी या लोकल ट्रेन चे भाजपाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

Welcome to Dahanu-Andheri local Palghar | डहाणू-अंधेरी लोकलचे पालघरला स्वागत

डहाणू-अंधेरी लोकलचे पालघरला स्वागत


पालघर : खासदार चिंतामण वनगा याच्या प्रयत्नाने आज पासून सुरु झालेल्या डहाणू अंधेरी या लोकल ट्रेन चे भाजपाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
पश्चिम रेल्वेचे उपनगरी क्षेत्र डहाणू रोडपर्यंत विस्तारीत झाल्यानंतर सुरु झालेल्या लोकल ची संख्या मर्यादित राहिल्याने त्याचा मोठा त्रास इथल्या प्रवाशांना सोसावा लागत होता.त्यातच डहाणू ते बोरिवली अशा लोकल धावत असल्याने अंधेरी पर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बोरिवली स्टेशन ला उतरून अंधेरी पर्यंत पोहचायला इथल्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असताना डहाणू-अंधेरी दरम्यान लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी प्रवाशांनी खासदार वनगा यांच्या कडे केली होती. त्यांच्या प्रयत्नाने प्रथमच आज डहाणू रोड ते अंधेरी स्थानकादरम्यानच्या पहिल्या लोकलचे आज सकाळी ६.१७ वाजता पालघर रेल्वे स्टेशनवर भाजपा मंडळाच्यावतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. अध्यक्ष तेजराजसिंह हजारी, पालघर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष जयंत दांडेकर, सरचिटणीस नंदु पावगी व पालघर राजस्थान विकास संघाचे मोहनलाल जैन, नीता चव्हाण इ, च्या पाठपुराव्याला यश येऊन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी अंधेरी लोकल आज सुरू झाली. बोरीवलीकडे जाणारी ईएमयू लोकल क्र . ९३००२ डहाणू रोड वरु न पहाटे ५.५० ऐवजी ५.४० वाजता सोडून तिचा विस्तार अंधेरी पर्यंत करण्यात आला आहे. यावेळी सर्व रेल्वे प्रवाशांनी ही सेवा सुरु करण्याकरता केलेल्या प्रयत्नांबद्दल भा.ज.पा चे आभार मानून आनंद व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Dahanu-Andheri local Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.