सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने पिकवलेल्या सीताफळाचे वजन अबब ६०० ग्रॅम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 21:53 IST2017-09-10T21:53:36+5:302017-09-10T21:53:46+5:30
पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इतक्या वजनाचे भरले आहे.

सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने पिकवलेल्या सीताफळाचे वजन अबब ६०० ग्रॅम
सातारा, दि. 10 - पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इतक्या वजनाचे भरले आहे.
पावसाने ओढ दिल्यानंतरही त्यांनी आपल्या कष्टातून सीताफळाची शेती पिकवून एक नवा आदर्श उभा केला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कुसुर्डी गावच्या दादा शेंगडे यांच्या शेतातील मार्केटयार्डात विक्रीस आलेले हे सीताफळ खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी गर्दी केली होती. याबाबत व्यापारी संतोष ओसवाल म्हणाले की, शेंडगे यांनी विक्रीस आणलेले सीताफळ आकाराने मोठे होते. तसेच त्यामध्ये गरही मोठ्या प्रमाणात होता. चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याची विक्रीही तात्काळ झाली.
सद्यस्थितीत सीताफळाचा हंगाम ऐन बहरात आला असून, मार्केटयार्डात आवक वाढू लागली आहे. रविवारी तब्बल सात ते आठ टन इतकी आवक झाली असून, मागणी वाढल्याने दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे संतोष ओसवाल यांनी सांगितले. बाजारात सध्या चांगल्या प्रतिच्या सिताफ ळांना मागणी आहे. तसेच दरही चांगले मिळत आहेत.