शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

कोणते वारे भिडता? का होते गारपीट? डॉ. रंजन केळकर यांनी उलगडले रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:42 IST

weather: हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  

- श्रीकिशन काळे पुणे - हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.  या पावसाला अवकाळीदेखील म्हणता येणार नाही, गारा पडल्याने  हा हवामान बदलाचा फटका असल्याचे म्हटले आहे. परंतु, तसे काहीही नसून या काळात अशी परिस्थिती असते, असे डाॅ. केळकर म्हणाले.

परस्परविरोधी वाऱ्यांचे प्रवाह भिडतात तेव्हा...- भारत उष्ण कटिबंधीय देश आहे. मात्र, उत्तरेकडील प्रदेश शीत कटिबंधात मोडतात. उष्ण कटिबंधावरचे वारे सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, शीत कटिबंधावरचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. - क्वचितप्रसंगी असे घडते की, हे परस्परविरोधी प्रवाह महाराष्ट्रावर एकमेकांना भिडतात. मग एकीकडची शीत व शुष्क हवा आणि दुसरीकडची उष्ण व दमट हवा यांची देवाणघेवाण होते आणि महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपीट होते.

गारा पडण्याची प्रक्रियाजमिनीपासून जितके वरती जावे तितके हवेचे तापमान कमी होत जाते. समजा, जमिनीचे तापमान ३० अंश सेल्सिअस आहे, तर मग ५-६ किमी उंचीवर हवेचे तापमान शून्य सेल्सिअस राहते. आता या स्तरावर असलेल्या ढगातील जलबिंदूचे घनीभवन होऊन त्यांचे सूक्ष्म हिमकणांत रुपांतर होते, असे हिमकण असलेले क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढग आकाशात खूप उंच वाढतात.वारे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी म्हणजे आडवे वाहतात. परंतु, वातावरणात असेही काही तरंग असतात जे उभे वाहतात; क्युम्युलोनिम्बस प्रकारच्या ढगात हे उभे किंवा उर्ध्वाधर तरंग खूप प्रबळ असतात. त्याच्यात बनलेले हिमकण या तरंगांमुळे वर फेकले जातात. त्यांच्याभोवती आणखी बाष्प जमा होते, ते मोठे होतात आणि परत खाली पडतात. हिमकण जर पुन्हा पुन्हा वर खाली करत राहिले तर त्यांच्यावर बर्फाचे थर चढत जातात आणि त्यांचा आकार आणि वजन वाढते. अखेरीस ते पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षामुळे खाली पडू लागतात आणि शेवटी जमिनीवर आदळतात तेव्हा त्यांना आपणगारा म्हणतो. 

शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणारी पिके ज्वारी, बाजरी आदी घ्यावीत. आता डाळिंबे, द्राक्ष, ऊस लावला जातो  नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीचे आहे. गारपीट होतेच. शेतकऱ्यांनी हवामान कधी कोणते असते, ते ओळखून पिके घ्यावीत. - डॉ. रंजन केळकर, हवामानतज्ज्ञ  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान