शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

"आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली तर...; अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाकडून खुणवाखुणवी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 3:21 PM

"आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील."

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आज शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले. यांत संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे. या जागेसाठी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते उत्सुक आणि शर्यतीत होते. अखेर, या जागेसाठी अंबादास दानवे यांना डावलण्यात आले आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर सलग सहाव्यांदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता, अंबादास दानवे यांच्या संदर्भात भाष्य करत, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल," अशी अप्रत्यक्ष ऑफरच शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी दानवे यांना दिली आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

शिरसाट म्हणाले, "आज चंद्रकांत खैरे यांची जी उमेदवारी जाहीर झाली, त्यांनाही जालना आणि बीडची जबाबदारी देण्यात आली होती. परंतू दानवेंना दिली नव्हती. म्हणजे विरोधीपक्षनेता आहे की केवळ नावाला आहे? बाहुल्यासारखा वापर करायचा. हे पक्षाने त्यांनी काय ठरवले असेल त्यांची भूमिका आहे. परंतु, निश्चितच दानवेंनी त्यांची भूमिका बदलली, तर त्यांना आम्ही निश्चितपणे सहकार्य करू. आता दानवे कुणाकडून उमेदवार राहतील? हा संभ्रम आहे." 

यावेळी, आपण त्यांना ऑफर देणार का? असा प्रश्न विचारला असता, "आम्ही ऑफर देणार नाही, त्यांनी मागणी केली, तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. आणि त्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील," असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

खैरे म्हणाले दानवे माझे शिष्य -यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले, दानवेच मला भेटायला येतील, कारण आता सर्व येतील त्याप्रमाणे तेही येतील. आम्ही सर्वजण एकमेकांना भेटत असतो. शिवसेनेत तेवढ्यापुरतीच स्पर्धा असते. एकदा तिकीट मिळाल्यानंतर आम्ही काही बोलत नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Shirsatसंजय शिरसाटAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना