शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवारांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं; इंदापूरात राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दातच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 00:38 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपचा डाव, काँग्रेस पक्ष नंबर एक राहणारराज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव करत आहे. परंतु, राज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुडाचा बदला घेण्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. अशी चुकीची परंपरा घातक ठरणारी आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधाम येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या वेळी इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून शेतकरी झगडत आहेत. मात्र केंद्र सरकार अद्यापि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रचंड प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे.  देश विकण्याचा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.इंदापूर विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या इंदापूरात सध्या दत्तात्रय भरणे आमदार आहे. ही जागा अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. याच जागेवरुन हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आता यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही काही इंदापूरची विधानसभा सोडणार नाही. सध्या राज्यात काँग्रेस पक्षालाच जोरदार पाठिंबा मिळतो आहे. पुढच्या विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर एक राहील, अशीही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस