शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही; यायचं असेल तर..., रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 14:50 IST

"ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले."

उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे की न यावे, हे बोलण्यासाठी काही आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचे असेल, कुणीही येणार असेल, त्यांना मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांना यायला काही हरकत नाही. त्यांना येण्यासाठी आमची ना नाही. या आणि आमच्यासोबत राहा. पण जे सरकार आमचे चाललेय, त्यात डिस्टर्ब करू नका, असे भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हणटले आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही -यावेळी, मैत्रिदिनाच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नाही. उद्धव ठाकरे काही दिवस आमच्यासोबत होते. 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. मात्र, 25 व्या वर्षी त्यांना वाटले, की भारतीय जनता पक्षासोबत राहून आपले नुकसान झाले. यामुळे त्यांनी आमची साथ सोडली. ज्या युतीला राज्यातील लोकांनी मतदान केले होते. त्याच्यासोबत  दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संधान साधले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. ते आमचे मित्र होते. आता पूर्व मित्र झाले. 

तसेच, आता आम्ही नवीन मित्र जोडले आहेत, एकनाथ शिंदे. ते आज आमचे मित्र आहेत. मित्र, म्हणजेच मूळ शिवसेना आहे आणि आता आम्ही एकत्र सरकार स्थापन केले आहे. यामुळे, मैत्री दिनाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना अशाच शब्दांचा वापर करायला हवा. की समोरच्याला वाईट वाटू नये. असाच शब्द प्रयोग कुण्या एखाद्या शिंदे गटातील आमदाराने केला असले, तर त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ते टीव्ही-9 सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावे -तत्पूर्वी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल,असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले होते.  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना