शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षात झाले नाही ते करतो आहोत :देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:12 IST

जे 20 वर्ष आधी व्हायला हवे होते ते आता आम्ही करतो आहोत. पुणे एक वैभवशाली शहर व्हावे असा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे: जे 20 वर्ष आधी व्हायला हवे होते ते आता आम्ही करतो आहोत. पुणे एक वैभवशाली शहर व्हावे असा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी संध्याकाळी झाले.

             मुख्यमंत्री म्हणाले, गेली अनेक वर्ष गाजतो आहे या रस्त्याचा प्रश्न. अडथळे आणले जात होते. पुणे हे मुंबई नंतरचे महत्वाचे शहर आहे. म्हणूनच आम्ही इथे  मेट्रो आणली. पुण्यात नवे विस्तारित मार्ग होत आहेत. स्वारगेटमध्ये हब तयार करतो आहोत. 20 वर्ष फक्त विकासाची चर्चाचं व्हायची अशा सर्व गोष्टींना आम्ही मान्यता दिली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. 

                प्रास्तविकात महापौर म्हणाल्या, अपघात कमी होण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्याच्या कामाची निविदा काढली. त्यावर आक्षेप घेतले गेले. तीन वेळा निविदा काढली व नंतरच काम दिले. सर्व द्रुष्टीने रस्ता वैशिष्ट्यपूर्ण केला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न आमचा असतानाही काहींनी त्याचे भूमीपूजन केले. स्थानिक आमदार टिळेकर म्हणाले, १९९७ साली आमच्या गावाचा महापालिकेत समावेश झाला. पण 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी यांनी काही केले.नाही. रस्ता होऊच नये असा त्यांचा प्रयत्न होता. जीव गेले अनेक. पण काम नाही, फरक नाही. भाजपाची सत्ता आली व रस्त्याच्या कामाला मान्यता दिली. शिवसेनेने रस्त्याचे आदल्यादिवशी भूमीपूजन केले. त्याचा आमदार टिळेकर व महापौर टिळक यांनी केविलवाणा प्रयत्न असा ऊल्लेख केला.

विद्यार्थी आभार मानण्यासाठी आल्याचा आमदारांचा दावा : भूमीपूजन कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांना गणवेशात उपस्थित ठेवण्यात आले होते. रस्ता अरूंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. काम सुरू केले त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थी आल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले.

नगरसेविकांना पण हवा फोटो  : कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सर्व महिला नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या मागे रांगेत ऊभ्या राहिल्या. फोटोग्राफरला त्या पटकन फोटो काढ म्हणून खुणावत होत्या. मुख्यमंत्र्यांच्याही ते लक्षात आले व त्यांनी मागे पाहून हसून त्यांना दाद दिली.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSmart Cityस्मार्ट सिटी