शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मित्र सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांच्यावरही मात करू- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 20:22 IST

भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचा शिवसेनेला सूचक इशारा

लातूर : २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल. कार्यकर्त्यांनी ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही स्वबळाचे संकेत दिले. मित्र पक्ष सोबत आले तर ठीक, अन्यथा विरोधकांसह त्यांचाही पराभव करू, असं शहा म्हणाले. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही फडणवीस मुख्यमंत्री झाले, याचीही आठवण त्यांनी करून दिली.लातुरात रविवारी बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, विजयासाठी दोन कोटी मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा अधिक सरकारचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ४० जागा जिंकण्याच्या तयारीला लागा. भाजपाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कार्यकर्ता आहे. संघटना हीच ताकद आहे. युती होईल की नाही, हे अध्यक्ष ठरवतील. २०१४ साली ‘अबकी बार-मोदी सरकार’ हा नारा होता. आता ‘फिर एकबार - मोदी सरकार’ हा नारा आहे. येणारा विजय मोठा असेल. स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. एकहाती सत्ता मिळवायची असेल तर दोन कोटी मते लागतील. त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत आपण योजना पोहोचवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरांपर्यंत गॅस पोहोचवला. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, भाजपाच्या कामाचा आधार हा संघटन असून, पक्षाचे ११ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. मीही १९८२ मध्ये बूथ अध्यक्ष होतो. २०१४ मध्ये आपल्याकडे सहा राज्ये होती. आज १६ राज्यांमध्ये भाजपा आहे. २०१९ मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपाची सत्ता येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे म्हणत शहांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने देशाला गुलामीतून मुक्तता मिळाली. पानिपतची लढाई आपण जिंकलो असतो तर इंग्रजांनी भारतात राज्य केले नसते. पानिपतची जशी लढाई होती, तशी २०१९ ची लढाई देशासाठी आहे. गठबंधन कोणाचेही होवो, विजय भाजपाचाच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ५५ वर्षांत त्यांनी कोणताही विकास झाला नाही. एक कोटी लोकांना घरे नव्हती. मोदी सरकारने बँक खाते नसलेल्यांना बँकेशी जोडले. सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक योजना सामान्यांसाठी दिल्या. महाराष्ट्रात ३० हजार गरिबांना घरे मिळणार आहेत, असे शहा म्हणाले.काँग्रेसच्या काळात परदेशातून घुसखोरी होती. उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाले. भाजपा सरकारने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, असेही शहा म्हणाले. तसेच यावेळी शहा यांनी गॅस कोणी दिला, शौचालय कोणी दिले हे घरोघरी जाऊन सांगा. आजच्या सारखे १०० मेळावे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील तसेच चारही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

राफेलमध्ये ५० पैशांचादेखील घोटाळा नाही राहुल गांधींवर टीका करताना अमित शहा म्हणाले, तुमचे चरित्र बघा, नंतर दुसऱ्यांवर आरोप करा. राफेलमध्ये ५० पैशांचाही घोटाळा नाही. उलट आई आणि मुलगा दोघेही जामिनावर बाहेर आहेत. ते खोटे बोलत आहेत. नांदेडवाले पण आदर्शमध्ये सुप्रीम कोर्टात येतील. 

बॅनर गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविनानांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद अर्थात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा लातूरला झाला. परंतु, मराठवाड्यातील दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविनाच शहरातील बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत होते. मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९