शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जो निर्णय राज्यपालांनी घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 21:53 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी  लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे'संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय आहे. 'विधानपरिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधीमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारशीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो. याशिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे.

विधान परिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार होती. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता राज्य सरकारकडून ही निवडणुक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र शिवसेनेकडून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधीमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी  विधान परिषदेवर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची  भेट घेतली. त्यावेळी कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी, अशा विनंतीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना दिले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे