अन्य राज्यांमधून ५०० टन ऑक्सिजन पुरवठा पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:52 AM2021-04-22T05:52:23+5:302021-04-22T05:52:33+5:30

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

We need 500 tons of oxygen supply from other states | अन्य राज्यांमधून ५०० टन ऑक्सिजन पुरवठा पाहिजे

अन्य राज्यांमधून ५०० टन ऑक्सिजन पुरवठा पाहिजे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या १,२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येत असल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी येथे सांगितले.


टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते, असा अंदाज आहे. राज्यात तयार होणारा १,२५० मे. टन ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो.  जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मे. टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात वाढ करून ५०० मे. टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांनीही केली चर्चा
मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिविर उत्पादकांबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आम्हाला गरजेप्रमाणे, ६० हजार रेमडेसिविर दिले पाहिजे.

राज्यात १,५५० मे. टन ऑक्सिजनचा वापर
nराज्यात अशा पद्धतीने एकूण १,५५० मे. टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जाते.
nराज्यात सहा ठिकाणे अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते; मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे, याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.

तीन हजार खाटा
पेण (जेएसडब्ल्यू  ), थळ (आरसीएफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून, त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचे नियोजन आहे.

Web Title: We need 500 tons of oxygen supply from other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.