शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:32 IST

"आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. संपूर्ण मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. याला विरोध म्हणून ओबीसी समाजाचे नेतेही आता समोर येऊ लागले आहेत. यातच आता, "आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे -जरांगे म्हणाले, "जे आमचच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळणारच ना. पण त्यांनी त्यांची भूमिका निश्चित करावी की, त्यांचा विरोध नेमका कशाला आहे? आम्ही कसे सांगायचे? आमचे आहे, ते आम्हाला मिळणारच आहे. पूर्वीपासून ओबीसी असल्याने सर्व हक्क आम्हाल मिळणारच आहेत. राज्यावर आणि केंद्रावरही." यावेळी, पत्रकारांनी राजकीय आरक्षणासंदर्भा प्रश्न विचारला असता, जरांगे म्हणाले. "आमच्या आहेत त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे."

मराठा समाजाचे सर्वाधिक वाटोळे समाजाच्याच नेत्यांनी केले -मराठा समाजाचे सर्वाधिक वाटोळे मराठा समाजाच्याच नेत्यांनी केले. मुख्यमंत्री असले म्हणून काय झाले. आमचे वाटोळे करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले, मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही, म्हणून तर आमचे एवढे वर्षं आरक्षण होते, ते त्यांनीच घालवले. त्यांनीच लोकांना वाटप करून टाकले, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही, तर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर गेल्या 20 वर्षांपासून कोण-कोण ओबीसीमध्ये आहेत त्यांची नावे आणि आपले आरक्षण कुणी दिले? त्यांची नावेही आम्ही समोर आणणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीkunbiकुणबी