शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्या बंडाशी आमचा संबंध नाही  : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 10:46 IST

पवार म्हणाले, भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली केल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तरीही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते त्यांना करता येणार नाही. तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल

कऱ्हाड : शिवसेना व राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. राज्याचा प्रत्यक्ष जेव्हा निर्णय घेण्याचा विचार होतो त्यावेळेस सर्व गोष्टी पहाव्या लागतात. मात्र आमच्या पक्षातील अजित पवार यांनी जो बंड करीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांना बडतर्फ करायचे की अन्य कारवाई याचा निर्णय पक्षातील सर्वजण घेतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली म्हणून काही होत नाही. अजून सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते 30 तारखेला समजेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.     कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सौरव पाटील उपस्थित होते.     पवार म्हणाले, भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली केल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तरीही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते त्यांना करता येणार नाही. तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण