रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; "तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 08:28 AM2024-03-07T08:28:35+5:302024-03-07T11:03:39+5:30

जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होतील तेव्हा माझे वैयक्तिक मत काय आहे हे मांडेन असं सांगत कदमांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. 

We have come with trust in Modi-Shah, but BJP should not betray - Shiv sena Ramdas Kadam | रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; "तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही..."

रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; "तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही..."

मुंबई - Ramdas Kadam on BJP ( Marathi News ) महाराष्ट्रात आम्ही शिवसेना-राष्ट्रवादी असो. मोदी-शाह यांच्या कामावर विश्वास ठेऊन सोबत आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षता भाजपाने घेणे आवश्यक आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना फटकारलं आहे. 

रामदास कदम म्हणाले की, ज्या आमच्या विद्यमान जागा आहेत तिथे काही भाजपाच्या मंडळी आम्हीच उमेदवार आहोत असं सांगतायेत. तालुक्यात, मतदारसंघनिहाय जातात तिथे हे सुरू आहे ही माझी खंत आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हे सुरू आहे. हे जे चाललंय ते महाराष्ट्र भाजपाच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देताय याचे भान भाजपाच्या लोकांना असणे गरजेचे आहे असंही कदमांनी म्हटलं. 

तसेच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केले. युती असतानाही गुहागरमध्ये मला भाजपाने पाडले. आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासाने भाजपासोबत आलो म्हणून मंत्रिमंडळ झाले. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात भाजपाचे चव्हाण आणि त्यांचे सहकारी निधी आणून भूमिपूजन करून स्थानिक आमदाराला बाजूला ठेवतायेत. हेतूपुरस्पर त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला. 

दरम्यान, हे असेच सुरू राहिले तर भविष्यात भाजपावर कुणी विश्वास ठेवणार नाही. याची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली पाहिजे. मोदी-शाह यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही आलोय. मागच्यावेळी काय झाले ते झालं, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझेही नाव रामदास कदम आहे. मीदेखील शिवसेनेचा नेता म्हणून २५ वर्ष काम करतोय. अधिक आज बोलणार नाही. जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होतील तेव्हा माझे वैयक्तिक मत काय आहे हे मांडेन असं सांगत कदमांनी भाजपाला थेट इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदेमुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले

शिवसेनाप्रमुखाच्या पोटी नालायक मुलगा जन्माला याची खंत आज महाराष्ट्राला आहे. आज ते एकनाथ शिंदेंमुळे बाहेर पडले. कुणी त्यांना विचारणार नाही. आधी ते बाहेर पडत नव्हते, कुणाला भेटत नव्हते. मुख्यमंत्री असतानाही मंत्रालयात जात नव्हते. पण एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्तीने बाहेर पडायला लागले. परंतु येत्या लोकसभेत पुन्हा एकदा मोठ्या फरकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात खासदार निवडून येतील यामध्ये कुणाच्या मनात शंका नाही असंही कदमांनी सांगितले. 

Web Title: We have come with trust in Modi-Shah, but BJP should not betray - Shiv sena Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.