शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Devendra Fadanvis answer Uddhav Thackeray: जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना व्हिडीओतून प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 19:52 IST

Devendra Fadanvis answer Uddhav Thackeray: व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे, असे ठाकरे म्हणाले होते.

जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला. याचवेळी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विज बिल माफीवरील वक्तव्य कार्यकर्त्यांना ऐकवले होते. य़ाला फडणवीसांनी लागलीच व्हि़डिओ आणि नुकताच काढलेला आदेश पोस्ट करून प्रत्यूत्तर दिले आहे. 

व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस विजबिल वसुलीविरोधात सरकारविरोधात बोलत होते. मध्य प्रदेश सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये देऊन बिले भरली, महाराष्ट्र सरकार सावकारी पद्धतीने विजबिल वसुली करत आहे. आता करून दाखवा, अशी टीका ठाकरे यांनी फडणवीसांवर केली. 

याला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री असतानाचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईवर बोललेल्याचा आणि आता सत्ता गेल्यानंतर बोललेल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावरून त्यांनी काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

हा पहा तो व्हिडीओ...

जे बोलतो ते करतो...यानंतर फडणवीस यांनी आणखी एक ट्विट करत महावितरणला विजबिल वसुली थांबविण्याचा आदेश पोस्ट केला आहे. यामध्ये कृषी बिलाच्या वसुलीसाठी चालू एका बिलाचा भरणा करून घ्यावा, जास्तीच्या थकबाकी वसुलीसाठी सक्ती करू नये असा आदेश पोस्ट केला आहे. यावर जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे!, असे म्हटले आहे. 

हे पहा दुसरे ट्विट...  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरण