आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही : हार्दिक पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:23 IST2018-10-16T13:22:14+5:302018-10-16T13:23:52+5:30
'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नसून आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही,' असे मत गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले.

आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही : हार्दिक पटेल
कऱ्हाड : 'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नसून आम्ही सरकारचं ऐकून डमरू वाजवू शकत नाही,' असे मत गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले.
सांगली येथे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी ते आले होते. दरम्यान, ते कऱ्हाड येथे आले असता त्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पटेल म्हणाले, 'गुजरातमध्ये हिंदी भाषिकांबरोबर गैरवर्तन केले जात नाही. कारण गुजरातमध्ये सर्वत्र हिंदी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात धनगर, मराठा समाजातील लोक आपल्या प्रतिनिधित्वासाठी लढत आहेत. सर्वांची जबाबदारी आहे की सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारावा. कारण आपण सर्वांनी मते दिलेली आहेत.' असेही यांनी सांगितले.