शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ज्या शाळेत हिंदुत्व शिकली त्या शाळेचे हेडमास्तर आम्ही, शिवसेना तर आमचा...; दानवेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 11:36 IST

या दोन्ही पक्षातील नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत...

राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्षातील नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यातच, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी, 'ज्या शाळेत शिवसेनेने हिंदूत्व शिकले, त्या शाळेचे हेडमास्तरच आम्ही आहोत,' अशा शब्दात शिवसेनेला टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.   

यांच्या शाळेचे हेडमास्तर आम्हीच होतो - "आज शिवसेना हिंदुत्वापासून कोसो मैल दूर गेली आहे. तेव्हा आमच्या शाळेत हे 30 वर्ष शिकले आहेत आधी आणि आता हे काय राज ठाकरेंना सांगतात, की यांचे शिक्षक दुसरेच आहेत म्हणून. यांच्या शाळेचे हेडमास्तर आम्ही आहोत. हे ज्या शाळेत हिंदूत्व शिकलेतना, त्या शाळेचे हेडमास्तरच आम्ही आहोत. हे (शिव सेना) तर आमचे विद्यार्थी होते. यांनी जेव्हा आमची शाळा सोडली आणि दुसऱ्या शाळेत गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागली, की आपल्याकडून चूक झाली. चूक दुरुस्तही करता येईना आता," असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरूनही साधला निशाणा -बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून सेनेवर निशाणा साधताना दानवे म्हणाले, "बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. त्या ठिकाणावर होतो. दुर्बिनीने शोधूनही आम्हाला तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर त्याचा एखादा पुरावा यांनी (शिवसेनेने) दाखवावा, की तेथे कोणता शिवसैनिक होता. तेथे हे कुणीही आले नाही. मी स्वतः तेथे होतो, गोपिनाथराव मुंड तेथे होते आणि त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. शिवसेना नव्हती. आता जे आम्ही केले, त्याचे श्रेय जर हे लाटत असतील, तर या देशातील जनतेला सर्व समजते."

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा