शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : ...आमची तयारी! शिवसेनेनं 'हा' संभ्रम एकदाचा दूर करावा; राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळ थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:05 IST

त्यांना (शिवसेनेला) जे काही सांगायचे आहे, त्यांनी आमचे नेते शरद पवार आणि अजित दादा यांना सांगावे आणि हा संभ्रम एकदाचा दूर करावा.

शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी शिंदे गटाची मुख्य मागणी आहे. त्यांच्या या मागणीवर एक पाऊल मागे येत, माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू त्यांनी पुढील २४ तासांत मुंबईत यावे." राऊतांच्या या वक्तव्यावर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, "आमच्यासाठी हे काही नवे नाही, सत्ता येते, सत्ता जाते. कधी विरोधी पक्षात कधी सरकारमध्ये. आमची तयारी आहे. त्यांना (शिवसेनेला) जे काही सांगायचे आहे, त्यांनी आमचे नेते शरद पवार आणि अजित दादा यांना सांगावे आणि हा संभ्रम एकदाचा दूर करावा. यावेळी एका पत्रकाराने, शिवसेनेने बाजी सोडली आहे का? असे वाटते का? असे विचारले असता, भुजबळ म्हणाले, "मी शिवसेनेने बाजी सोडली, वैगेरे यावर काहीही बोलणार नाही. कारण ते आमच्या सरकारमधील सहकारी पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही विधान करणे योग्य नाही."

यावेळी, एका पत्रकाराने भुजबळ यांना विचारले, की  राष्ट्रवादीचे काही आमदार बोलत आहेत, की आपणही भाजपसोबत जाण्यची गरज आहे, अशी काही मागणी तुमच्याकडे आली आहे का? यावर भुजबळ म्हणाले,  भाजपसोबत जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी नाही. पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष, कार्यकर्ते, आमदार  मजबूतपणे उभे आहेत.

काय म्हणाले होते राऊत - "शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस