शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आम्ही नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीच शिवसेना 'हायजॅक' करत होते; शिंदे समर्थकांनी पुन्हा सोडला 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:31 IST

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दुसरीकडे दिपक केसरकर यांनी मात्र माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंच शिवसेना हायजॅक केली होती, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. ५५ आमदारांचा नेता १६ जण कसा बदलणार? विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. आम्ही सगळे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेना सोडली असं भासवलं जातंय. आम्ही शिवसेनेतच आहोत. लोकांना रस्त्यावर उतरण्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे नेला जाईल याची खात्री देतो,” असंही केसरकर यावेळी म्हणाले.आम्हीच शिवसेना आहोत. विधीमंडळात दोन तृतियांश बहुमत सिद्ध करू. शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. आम्ही कुठेही शिवसेना संपवत नाही. कोणीही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांवर कोणतेही आरोप करत नाही. आम्हाला सर्वांच्याबाबत प्रेम आहे. पहिल्यापासून आम्ही त्यांना भाजपसोबत राहिलं पाहिजे हे सांगतो. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जेव्हा एका दिशेने चालताता तेव्हा राज्यही मोठं होतं. पंतप्रधानांना मातोश्री आणि मुख्य करून बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना