शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

आम्ही कोल्हापूरी, जगात भारी :  'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 1:22 PM

कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे.

ठळक मुद्देआम्ही कोल्हापूरी, जगात भारी : 'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरचीपंतप्रधानांनी केले कौतुक : भाषणात संकल्पना केली व्हायरल

संदीप आडनाईककोल्हापूर : कोरोनाची भयावहता दाखविणारे आणि रस्त्यावर फिरु नका असे सांगणारे 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीचे डिझाईनचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला उद्देश्शून केलेल्या भाषणादरम्यान व्हायरल केले. विकास सदानंद डिगे या कोल्हापूरच्याकलाकाराची ही संकल्पना असून मोदी यांनी दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या कलाकाराचा सन्मान केला आहे. आम्ही कोल्हापूर, जगात भारीचे प्रत्यंतर पुन्हा आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातून कोरोना विषाणूविषयी काळजी घेण्याचे आणि देशात २१ दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली. या भाषणादरम्यान कोरोना : 'कोई भी रोडपे ना आये' असे लिहिलेल्या जाहिरातीचा फलक दाखवून कोरोना विषाणूविषयी सावध राहण्याचे आवाहन केले. ही संकल्पना मोदी यांना आवडल्यामुळे त्यांनी त्याचे कौतुक करुन आवर्जुन या संकल्पनेचा उल्लेख केला.या जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरचे पहिले खासदार शंकरराव खंडेराव डिगे यांचे नातू आणि चळवळीतील कार्यकर्ते व एस.के. डिगे फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांचे चिरंजीव विकास डिगे यांची आहे. सदानंद डिगे यांना महराष्ट्र सरकारचा समाजभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचे चिरंजीव विकास यांनी कलानिकेतन मधून कमर्शियल आर्टची पदवी घेतली असून गेली सात वर्षे ते अ‍ॅड टुमारो अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टुडिओ ही जाहिरातविषयक कंपनी चालवतात.कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे. ही जाहिरात १९ आणि २0 मार्च रोजी सोशल मिडियावरुन खूपच व्हायरल झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू रविवार, दि. २२ मार्च रोजी जाहीर केला.

या दिवशीही ही जाहिरात सोशल मिडियावरुन व्हायरल केली. तिला खूपच प्रतिसाद मिळाला.नरेंद्र मोदींच्या पाहण्यात ही जाहिरात आल्याने त्यांनी मंगळवारच्या भाषणात याच्या संकल्पनेचे कौतुक केले. ही जाहिरात विकास डिगे यांनी मोदी यांना ट्विटरवरुन टॅग केली आहे.मोदींकडून कोल्हापूरच्या कलाकाराचा दुसऱ्यांदा दादपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या कलाकारांना दुसºयांदा दाद दिली आहे. यापूर्वी निर्मिती अ‍ॅडर्व्हटायजिंगचे अनंत खासबारदार यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी तयार केलेल्या लोगोचे कौतुक करुन त्यांचा अधिकृतरित्या सन्मान करण्यात आला होता. आताही कोरोनाविषयीच्या संकल्पनेलाही मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून दाद दिली आहे.

कोरोना विषाणूविषयीची गंभीरता समाजासमोर येण्यासाठी सोप्या भाषेत जाहिरात करणे गरजेचे होते. यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून ही जाहिरात आम्ही तयार करुन व्हायरल केली. पंतप्रधानांनी या जाहिरातीचे कौतुक करुन एका अर्थी कोल्हापूरच्या कलाकाराचा सन्मानच केला आहे.विकास डिगे,प्रमुख, अ‍ॅड टुमारो अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टुडिओ, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीartकला