शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 18:41 IST

मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई: विधानसभा निवडणूक युतीतच लढणार आहोत. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत लोकसभा निवडणुकीतील विजयानं हुरळून जाऊ नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असं आवाहन केलं. सध्या शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं जात आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला. मी फक्त भाजपाचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री नाही. कारण राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार आहे, असं फडणवीसांनी म्हटलं. विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट करतानाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असलेले अनेक जण आहेत. तशी मंडळी आमच्याकडेदेखील आहेत. मात्र त्यांच्याकडे बोलणारी मंडळी जरा जास्तच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.लोकसभा निवडणुकीत जनतेनं युतीला भरभरुन मतदान केलं. राज्यातील जनता माझ्यासाठी दैवत आहे. मतदारांनी दिलेला जनादेश अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्याचा कोणीही गर्व करू नये, जनतेला गृहित धरण्याची चूक करू नका, असा सल्ला  मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपली लढाई पराभूतांविरुद्ध असल्यानं कोणतीच भीती नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांनीदेखील टोला लगावला. विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष पराभूत झालेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना