१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार
By Admin | Updated: February 28, 2016 19:27 IST2016-02-28T19:27:22+5:302016-02-28T19:27:22+5:30
तीव्र पाणीटंचाईचा सामना करणा-या औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार
>ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. २८ - तीव्र पाणीटंचाईचा सामना करणा-या औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. १ मार्च ते २५ मार्चपर्यंत हा पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. सोबतचं पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये यासाठी गोदावरी नदीवरील गावांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. २१ तासांसाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.