शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई; पाणवठे पडले कोरडे, तहानेने वन्यप्राणी गावाच्या वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:19 IST

कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो

आनंदा सुतारवारणावती : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जंगलातील नैसर्गिक, तसेच कृत्रिम पाणवठे तळ गाठू लागल्याने वन्यप्राण्यांपुढे तहानेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिणामी पाण्याच्या शोधात काही वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळू लागल्याने प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणि पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र, सध्या आर्थिक वर्ष संपत आल्याने अनेक ठिकाणी नवीन कामे पूर्ण करणे आणि त्यांची बिले निकाली काढणे यावर प्रशासनाचा भर असल्याचे चित्र आहे. याच गडबडीत वन्यप्राण्यांच्या पाण्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. गाभा क्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटले असून, या काळात कृत्रिम पाणवठेच वन्यप्राण्यांचा मुख्य आधार ठरतात. मात्र, अनेक ठिकाणी हे पाणवठे कोरडे पडल्याने बिबट्या, गवा, भेकर, सांबर यांसारखे प्राणी पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. त्यामुळे काही गंभीर परिणामांची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या शोधात प्राणी गावांकडे येऊ लागल्याने पाळीव जनावरांवर हल्ल्यांचा धोका वाढू शकतो. जंगलाबाहेर पडणाऱ्या प्राण्यांवर शिकारी टपून बसण्याची शक्यता वाढत आहे कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. वन विभागाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून पाणवठे भरले नाहीत, तर वन्यप्राण्यांचे जंगलाबाहेर स्थलांतर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना, सह्याद्रीतील या पाणीटंचाईकडे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने लक्ष देतात का, याकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

“नवीन सिमेंटच्या कामांपेक्षा सध्या कोरडे पडलेले पाणवठे भरणे अधिक महत्त्वाचे आहे. तहानलेले प्राणी गावांकडे येणारच. योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढू शकतो.” - मनिषा पाटील, शिराळा पंचायत समितीच्या सदस्यासह्याद्री प्रकल्पातील सर्व कृत्रिम पाणवठे लवकरच भरले जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन सध्या सुरू आहे. - ऋषिकेश पाटील, वनक्षेत्रपाल, चांदोली

English
हिंदी सारांश
Web Title : Sahyadri Tiger Reserve Faces Water Crisis; Animals Seek Water in Villages.

Web Summary : Water scarcity intensifies in Sahyadri Tiger Reserve. Depleted water sources force wildlife to seek water near villages, raising concerns about human-animal conflict. Immediate water supply is crucial to prevent migration and potential dangers.