शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पुण्यातील सोसायट्यांमध्ये रात्री पाणी घुसले, सकाळी ओसरले; नाशकात पाऊस, मराठवाड्यात आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:38 IST

Pune Rain Alert: पुणे अलर्ट मोडवर : अनेक धरणे तुडुंब : विसर्ग सुरूच, तीन दिवसांत ६ टीएमसी जायकवाडीत

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक/पुणे : तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ४ ऑगस्टपर्यंत साडेसहा दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून, ते तहानलेल्या मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरत आहे. अद्याप रिते असलेल्या जायकवाडी धरणात चोवीस तासांत दोन टीएमसी (दलघफू) पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पवना धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने बोपोडीतीन नदी शेजारील सोसायट्यांमध्ये पहाटे ४ वाजता पाणी घुसले होते. काही तासानंतर हे पाणी ओसरले. 

निळवंडेचेही पाणी जायकवाडीकडे नाशिक गंगापूर धरण ८६% भरले...: नाशिक शहर व परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३०.२ तर गेल्या २४ तासांत १०५.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. गंगापूर धरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ टक्के भरले. जलसाठा ४,८३४ दलघफूपर्यंत पोहोचला आहे. 

गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून ८००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील धरणातून कडवा आतापर्यंत १ टीएमसी, दारणातून ५.२ टीएमसी, भाममधून १.७ टीएमसी याशिवाय भावली धरणासह गोदावरी कालव्यांमधून एकत्रित ६.४६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, त्र्यंबक, इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातही पाण्याची नव्याने आवक झाली आहे. त्यामुळे मुळा धरण रविवारी ७५ टक्के इतके भरले. निळवंडे धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने तो जायकवाडी धरणात जमा होत आहे.

देशातील पाणीसाठ्यांची पातळी अजून कमीचनवी दिल्ली : देशभर मुसळधार पाऊस कोसळूनदेखील १५० प्रमुख पाणीसाठ्यांनी अजून गेल्या वर्षीइतकी पातळी गाठलेली नाही. सध्या देशात ६९.३५ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, झारखंडमध्ये खरकाई आणि स्वर्णरखा या दोन नद्यांना पूर आला आहे.पुणे परिसरातील धरणे भरली असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यातच पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने आपत्तीव्यवस्थापन कक्षासह प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. एनडीआरएफ व लष्कर तैनात आहे. काही लोकांनासुरक्षितस्थळी हलवले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर