जलसंधारणामुळे टंचाई निवारण शक्य
By Admin | Updated: March 6, 2017 02:18 IST2017-03-06T02:18:33+5:302017-03-06T02:18:33+5:30
जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले.

जलसंधारणामुळे टंचाई निवारण शक्य
नारायणपूर : जलसंधारणाच्या कामामुळे आणि गावाच्या एकीमुळे हे शक्य झाले. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन जलसंधारणाची मोहीम राबवून गावे टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करावीत, असे आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी यांनी केले. तसेच पानवडी गावाने एकजुटीने केलेल्या कामाचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले.
पानवडी येथील पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यात केलेल्या जलसंधारणाच्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे उपसचिव गोपाळ साधवानी आणि रूपक चौधरी यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जलसंधारणाच्या कामाबरोबरच इतर कामाचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, प्रांताधिकारी संजय आसवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, छोटे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भोसले, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती लोळे, सुषमा भिसे, अनिता लोळे, मंगल धीवार, आबा लोळे, सोसायटी चेअरमन रामदास भिसे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ, काळदरीचे ग्रामसेवक शशांक सावंत, कृषी पर्यवेक्षक दिलीप जाधव, गंगाराम जाधव , तंटामुक्ती अध्यक्ष अमोल लोळे उपस्थित होते.
या वेळी राजे शिवराय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यामातून आणि पारंपरिक ढोल-लेझीम खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर पथकाने वडाचीवाडी स्मशानभूमी लगतच्या सिमेंट बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन केले. तसेच भिसेवाडी येथील तलावातील गाळ काढलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत सदस्या सुषमा भिसे, रामदास भिसे, सायली भिसे यांनी आपल्या मनोगतात गावात राबविलेल्या विकासकामांची माहिती दिली. माजी सरपंच हरिभाऊ लोळे यांनी प्रास्ताविक केले.
(वार्ताहर)
>३५ जिल्हे : फक्त पुण्याची निवड
जलसंधारणाबरोबरच गतिमान प्रशासन चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल संपूर्ण राज्यातील ३५ जिल्ह्यांतून एकमेव पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढील टप्प्यात संपूर्ण देशातून निवड करण्यात येणार असून, उत्कृष्टपणे विकासकामे करून आदर्श ठरणाऱ्या गावांना पंतप्रधान कार्यालयामार्फ त पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील कामांची पाहणी करण्यात आल्याचे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.