शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पुणे जिल्ह्यात सौर ऊर्जेवर येणार शिवारात पाणी ; जिल्ह्यात २९५ पंप कार्यान्वित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 23:00 IST

वीज बिल होणार बंद

ठळक मुद्देसौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधीवीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी

पुणे : शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सौर ऊर्जेद्वारे पाणी खळाळणार असून, त्यासाठी त्यांना आता एकही पैसा वीजबिलापोटी द्यावा लागणार नाही. जिल्ह्यातील २९५ कृषिपंप कार्यान्वित झाले असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिली.   महावितरणच्या मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागामधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८०६ शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७५४ शेतकऱ्यांना योजनेचे कोटेशन दिले होते. त्यातील ४८४ शेतकऱ्यांनी आपल्या वाट्याची रक्कम भरली. त्यानुसार महावितरणकडून संबंधित एजन्सीला काम करण्याचे कंत्राट दिले. आतापर्यंत तीन एचपी क्षमतेचे २४३ आणि पाच एचपी क्षमतेचे ५२ असे २९५ सौर कृषिपंप चालू केले आहेत. तर, सद्य:स्थितीत ५५ सौर पंप कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही अथवा १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात येते. त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. वीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसल्याने या ठिकाणी डिझेलचा वापर करून कृषिपंप चालवले जातात. या अडचणीतून मुक्तता मिळावी यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा कृषी पंप योजना हाती घेतली आहे. कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही अथवा वीजजोडणी प्रस्ताव प्रलंबित असलेल्या शेतकºयांना या योजनेत सहभागी होता येते. सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्यासाठी ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.--सौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. या यंत्रणेला बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. तीन किंवा पाच एचपी क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत २.२५ ते २.५० लाख असून, खुल्या वर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के आणि इतर प्रवर्गांसाठी ९५ टक्के अनुदान दिले जाते. या वर्षी २५ हजार सौर कृषिपंप वितरीत केले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी