शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांवर तरूणीचा हल्ला

By admin | Updated: July 26, 2014 22:19 IST

मुलाखतीसाठी अर्ज न स्वीकारल्याने राग अनावर

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकेच्या मुलाखतीसाठी आलेल्या एका युवतीने रागाच्या भरात जिल्हा शल्य चिकित्सकाला मारहाण केली. सदर घटना २५ जुलै रोजी सकाळी १0:३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय युवतीविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३३६, ५0४ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागेसाठी आज २५ जुलै रोजी थेट उमेदवारांच्या थेट मुलाखती होत्या. या मुलाखतीसाठी अकोला जिल्हयतील मातोडी येथील सरिता शिरसाट नावाची युवती परिचारिकेच्या मुलाखतीसाठी आली होती; परंतु वाशिम जिल्हय़ामध्ये परिचारिकेचे एकही पद रिक्त नसल्याने या जागेसाठी उमेदवारांनी मुलाखतीकरिता अर्ज करू नये, अशा प्रकारची सूचना विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून २३ जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. परिचारिकेच्या पदाकरिता मुलाखत अर्ज का स्वीकारत नाही म्हणून सरिता सिरसाट हिने थेट जिल्हा शल्य चिकीत्सक व्ही.डी. क्षीरसागर यांचे कार्यालय गाठले. यावेळी सिरसाट हिने जिल्हा शल्य चिकित्सकाला विचारना केली तिला व्यवस्थित समजावून सांगितले. मात्र, सिरसाट हिचा राग अनावर झाल्याने तीने जिल्हा शल्य चिकित्सकाची कॉलर पकडून टेबलावरील फाईल्स फेकून दिल्या. त्यानंतर सदर युवतीने डॉ. क्षिरसागर मिटींग मध्ये जात असताना त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. अशा प्रकारची फिर्याद डॉ. क्षीरसागर यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी डॉ. क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून सरिता शिरसाट हिचेविरूध्द सरकारी कामामध्ये अडथळा आणणे कलम ३५३, दुसर्‍याचा जीव धोक्यात टाकणे कलम ३३६ व शिवीगाळ करणे कलम ५0४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली.