ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:44 IST2026-04-10T12:42:03+5:302026-04-10T12:44:21+5:30

Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका ठिकाणी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे म्हटले जात आहे.

was there really a meeting with thackeray group mp deputy cm eknath shinde told everything | ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...

ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...

Deputy CM Eknath Shinde News: राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी या कथित बैठकीच्या वृत्तावरून शिंदेसेनेवर टीका केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर, दोन खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते, असे सांगितले गेले. यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले. अशी कोणतीही बैठक झाली नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच या सगळ्या अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ

ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उद्धवसेनेचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका ठिकाणी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेत खासदारांना शिंदे गटात सामिल होण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title : क्या शिंदे ने ठाकरे के सांसदों से मुलाकात की? DCM शिंदे ने दी सफाई।

Web Summary : डिप्टी सीएम एकनाथ शिंदे ने ठाकरे के सांसदों से मुलाकात की खबरों का खंडन किया। उन्होंने दल-बदल की अफवाहों को निराधार बताया और कहा कि ऐसी खबरें भ्रामक हैं। शिंदे के बेटे श्रीकांत शिंदे ने भी बैठक को झूठा बताया।

Web Title : Did Shinde meet Thackeray's MPs? DCM Shinde clarifies the rumors.

Web Summary : DCM Eknath Shinde denies meeting Thackeray's MPs amid defection rumors. He refuted claims of offering them to join his faction, labeling such reports baseless and misleading. Shinde's son, Shrikant Shinde, also dismissed the meeting as false.