वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
By Admin | Updated: August 5, 2016 17:23 IST2016-08-05T17:23:30+5:302016-08-05T17:23:30+5:30
वारणा (चांदोली) धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून सध्या ३१.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ९१.५ टक्के भरले आहे.

वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ५ : वारणा (चांदोली) धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून सध्या ३१.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ९१.५ टक्के भरले आहे. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून सध्या धरणात ७९.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ७५.४३ टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे वारणा आणि कोयना धरणाचे दरवाजे शुक्रवारी सायंकाळी दोन फुटाने उचलण्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील ९३ गावांतील १७ हजार ५४८ कुटुंबांना सावधानतेचा इशारा दिला आहे.