रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 'गोदान'चा अपघात टळला
By Admin | Updated: August 31, 2016 19:10 IST2016-08-31T18:19:32+5:302016-08-31T19:10:17+5:30
सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कमुळे अप गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला़ वेळीच बिघाड लक्षात आला नसता तर या गाडीचे डबे रूळावरून घसरले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली़.

रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 'गोदान'चा अपघात टळला
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 31 - सी अॅण्ड डब्ल्यू विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अप गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला़ वेळीच बिघाड लक्षात आला नसता तर या गाडीचे डबे रूळावरून घसरले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली़.
झाले असे की, अप ११०५६ गोरखपूर-एलटीटी गोदान एक्स्प्रेस बुधवारी सकाळी ८. २५ वाजता रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर येत असताना वातानुकूलित बोगी (बी़१) च्या ट्रॉली सोल बारला मोठा तडा गेल्याचे सी अॅण्ड डब्ल्यू विभागातील कर्मचारी आशिष चौधरी यांना लक्षात गेल्याने त्यांनी लागलीच वरिष्ठांना कल्पना दिली़. एव्हाना गाडी प्लॅटफार्मवर थांबली असताना गाडीचे पूर्ण निरीक्षण करण्यात आल्यानंतर बिघाड झालेली बोगी बाजूला करण्यात आली व तेथे पर्यायी स्लीपर डबा जोडून गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली़. या प्रकारात तब्बल दोन तास गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली़.
दरम्यान, रेल्वे यंत्रणेने तातडीने बिघाडाची गांभीर्याने दखल घेतल्याने अप्रिय घटना टळली़.