मुंबईतील मानखुर्दमध्ये गोदामांना भीषण आग

By Admin | Updated: January 12, 2017 22:29 IST2017-01-12T18:54:02+5:302017-01-12T22:29:17+5:30

मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागलेली आहे. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली असून आग विझविण्यासाठी घटनास्थळी

Warehouses in Mankhurd, a severe fire | मुंबईतील मानखुर्दमध्ये गोदामांना भीषण आग

मुंबईतील मानखुर्दमध्ये गोदामांना भीषण आग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - : मानखुर्द येथील मंडाला विभागात असलेल्या गोदामांना भीषण आग लागलेली आहे. ही आग संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास लागली असून आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या दाखल झाल्या आहेत. 
मंडाला विभागातील कुर्ला स्क्रॅप असोसिएशनमध्ये तेलाचे गोदाम असून या गोदामाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर बाजूला असलेल्या रद्दीच्या गोदामाला आग लागल्यामुळे आगीचे लोळ मोठ्याप्रणात पसरले आणि येथे असलेल्या झोपडपट्टीला आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळाल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या १६ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 
या आगीत राजीव यादव आणि अजू पाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. राजीव यादव यांना शताब्दी आणि अजू पाल यांना राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना येथील शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. तर, सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच, या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. 
 

Web Title: Warehouses in Mankhurd, a severe fire