मुख्यमंत्र्यांविरोधात वारकरी करणार भजनी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:47 IST2017-10-06T15:46:35+5:302017-10-06T15:47:00+5:30
पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात वारकरी करणार भजनी आंदोलन
मुंबई - पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत सरकारने मागणी मान्य केली नाही, तर १ लाख वारकरी हाती टाळ घेऊन आझाद मैदानावर भजन आंदोलन करणार आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले की, ३ जुलैपासून विविध माध्यमांतून सरकारला वारकऱ्यांनी आपली मागणी सांगितली आहे. बडव्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलने केली. आता सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर सरकारने मंदिर समितीचा राजकीय आखाडा केला आहे. त्यामुळे मंत्रालय आणि सरकारच्या कानावर टाळांचा आवाज पोहोचवण्यासाठी वारकरी अहिंसक मार्गाने भजनी आंदोलन करणार आहे.