शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

समस्यांच्या रावणाचे दहन करून नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:53 IST

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी ...

मुंबई : महायुतीसमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही; मात्र सर्वांत मोठे आव्हान हे समस्यांचे आहे. सत्तेत आल्यावर समस्यांच्या १० तोंडी रावणाचे दहन करून मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले. भांडुप येथे शिवसेना उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, वरळीतून मी उभा असलो तरी ही निवडणूक मी स्वत:साठी नाही, तर नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढवत आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्रातले २०० मतदारसंघ फिरलो. जिथून माझा ताफा जायचा तिथे विविध निवेदने लोक मला देत. त्या निवेदनांमध्ये लोक विविध समस्या घेऊन येत होते. अनेक निवेदनांमधून टीकादेखील होत असे. माझ्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत म्हणून लोक मला निवेदने देत होते. या दौऱ्यादरम्यान मला काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कुठेच दिसली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेना व भाजप यांनी एकत्र वचननामा काढला असता तर तो मोठा ग्रंथ झाला असता म्हणूनच दोघांनी वेगळे वचननामे काढले. मागची पाच वर्षे ही काँग्रेस, राष्ट्रवादीची पापे पुसण्यात गेली. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असून महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे, त्यासाठीच महायुतीचे सगळे आमदार निवडून येणे गरजेचे आहे. महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता असल्यावर काम करणे सोपे होते, असे ते म्हणाले.

बेस्टच्या भाडेकपातीमुळे १० लाख प्रवासी वाढले. यामुळे पुढील ३ वर्षांत ३ हजार बस वाढवणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन कचरा उचलला जायचा; परंतु सुका कचरा व ओला कचरा यांच्या वर्गीकरणास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज प्रतिदिन कचºयाचे प्रमाण साडेसहा हजार मेट्रिक टन एवढे कमी झाले आहे. मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत एकूण १७,४५६ खाटा आहेत. मुंबईसारखी आरोग्य सेवा देशात कुठेच उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये व्हर्चुअल क्लासरूमबनवून सगळीकडे शिक्षणाचा दर्जा समान करायचा आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट निर्माण करून १० रुपयांत थाळी या योजनेंतर्गत त्या महिलांच्या हाती काम देणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बर्गरच्यादुकानात आॅफर असल्यावर महागडा बर्गर २० रुपयांना विकला जातो; मग आम्ही गरजू लोकांना १० रुपयांत थाळी दिल्यावर विरोधकांच्या पोटात का दुखते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी अयोध्येत राम मंदिर होणारच, अशी घोषणाही आदित्य यांनी केली.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेworli-acवरळीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019