नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र

By अरुण वाघमोडे | Updated: December 20, 2025 07:41 IST2025-12-20T07:40:23+5:302025-12-20T07:41:29+5:30

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता अर्जासोबतच शहर विकासासंबंधी निबंधदेखील सादर करावा लागणार आहे.

Want to become a corporator? Write an essay on city development; An affidavit will have to be submitted to the commission | नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र

नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र

अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना आता अर्जासोबतच शहर विकासासंबंधी निबंधदेखील सादर करावा लागणार आहे. १०० ते ५०० शब्दमर्यादेत निवडून आल्यानंतर मतदारसंघात कोणत्या विकास योजना राबविणार आहेत, याची स्पष्ट मांडणी उमेदवारांना करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने १७ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशातील 'ब' क्रमांकात मतदारसंघ विकास योजनेबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

निवडणुकीत भ्रष्ट मार्ग अवलंबणार नाही, असे शपथपूर्वक जाहीर करावे लागणार आहे. याशिवाय, उमेदवाराने स्वतः, त्याची पत्नी, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असे शपथपत्रात नमूद करावे लागेल.

नगर परिषद मतदानाचा टप्पा २ आज

मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य तसे विविध नगरपरिषदा व नगर पंचायतींमधील १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान शनिवारी होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे एकत्रित निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते.

मतमोजणी २१ डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी २ १० वाजता सुरू होईल. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळेही नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Want to become a corporator? Write an essay on city development; An affidavit will have to be submitted to the commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.