शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारसाठी हवा आवडीचा क्रमांक? मोजा मग दुप्पट पैसे, राज्य सरकारची नव्याने अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:23 IST

Number Plate: सर्वांचे लक्ष वेधून घेईल, असा नंबर आपल्या वाहनाला मिळावा, यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) जादा पैसे मोजण्याचीही अनेकांची तयारी असते. अशाच हौशी लोकांना आता त्यांना हवा तसा गाडीनंबर मिळविण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

 मुंबई - सर्वांचे लक्ष वेधून घेईल, असा नंबर आपल्या वाहनाला मिळावा, यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) जादा पैसे मोजण्याचीही अनेकांची तयारी असते. अशाच हौशी लोकांना आता त्यांना हवा तसा गाडीनंबर मिळविण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांकाच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. तशी अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली. 

१८६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्तशुल्कवाढीमुळे परिवहन विभागाच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत दोन लाख १० हजार २८० जणांनी पसंतीचे वाहन क्रमांक खरेदी केल्याने १८६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

ज्याला त्याला हवा ‘०००१’अलीकडच्या काळात उच्चपदस्थ अधिकारी, वलयांकित व्यक्ती, राजकारणी, बडे उद्योगपती, तसेच हौशी मंडळी विशिष्ट क्रमांकासाठी आग्रही असतात. त्यांना त्यांच्या वाहनासाठी ठरावीकच नंबर हवा असतो.विशेषत: ‘०००१’ हा नंबर आपल्या गाडीला मिळावा यासाठी चढाओढ असते. त्यासाठी आतापर्यंत तीन लाख रुपये शुल्क आकारले जात होते.ते आता सहा लाख रुपये करण्यात आले आहे, तसेच अनेकांनी एकाच वेळी याच क्रमांकासाठी अर्ज केल्यास त्याचा लिलाव करून अर्जदाराला त्याच्या तिप्पट रक्कम १८ लाख रुपये  जमा करावी लागणार आहे.दुचाकींच्या बाबतीत ‘०००१’ नंबरचे शुल्क ५० हजारांवरून एक लाखापर्यंत वाढविले. मालिकेत नसलेल्या नंबरच्या आग्रहासाठी ही रक्कम तिप्पट होईल. 

या नंबरसाठी मोजा अडीच लाख रुपये०००९, ००९९ आणि ९९९९ या नंबरसाठी चारचाकीधारकांना अडीच लाख रुपये मोजावे लागतील, तर दुचाकीधारकांना ५० हजार रुपये शुल्क भरावे लागेल. अशा विशिष्ट ४९ अतिरिक्त क्रमांकांसाठी चारचाकीधारकांना ७० हजार रुपये, तर दुचाकीला १५ हजार रुपये शुल्क द्यावे लागले. १८९ पसंतीच्या क्रमांकांची रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. 

तब्बल ११ वर्षांनी वाढविण्यात आले शुल्क - पसंतीच्या क्रमांकांसाठी ११ वर्षांनी शुल्क वाढविण्यात आले आहे. २४० असे व्हीआयपी क्रमांक राज्य शासनाने प्रत्येक मालिकेसाठी निश्चित केले आहेत.- १६ असे इतर लाेकप्रिय क्रमांक आहेत, ज्यांचे शुल्क कारसाठी १ लाख आणि दुचाकींसाठी २५ हजार रुपये असेल.-४८८ एकूण लाेकप्रिय क्रमांक प्रत्येक मालिकेसाठी सरकारने निश्चित करण्यात आले आहेत.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार