डॉल्बीच्या दणदणाटाने भिंत कोसळली, साता-यात ३ ठार
By Admin | Updated: September 9, 2014 11:19 IST2014-09-09T09:29:00+5:302014-09-09T11:19:08+5:30
सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टिमच्या आवाजामुळे भिंत कोसळून ३ ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

डॉल्बीच्या दणदणाटाने भिंत कोसळली, साता-यात ३ ठार
>
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ९ - सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टिमच्या आवाजामुळे भिंत कोसळून तीन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील राजपथ भागात ही दुर्घटना घडली असून यामुळे गणेश सर्जन मिरवणुकीला गोलबोट लागले.
सोमवारी रात्री शहरातील राजपथ परिसरातून गणपतीची मिरवणूक जात होती, त्यावेळी तेथे डॉल्बी सिस्टिममुळे मोठा आवाज होता. त्या दणदणाटामुळे त्या परिसरातील एका जुन्या इमारतीची भिंत तेथेच असलेल्या वडापावच्या गाडीवर कोसळली. वडापाव खाणारे काही नागरिक त्या ढिगा-याखाली अडकले, ज्यात तिघांचा मृत्यू झाला तर इतर दोन जण जबर जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.