वाकोल्यात तरुणीची गळा चिरून हत्या

By Admin | Updated: April 10, 2017 06:35 IST2017-04-10T06:35:24+5:302017-04-10T06:35:24+5:30

सार्वजनिक ठिकाणी एका अठरा वर्षांच्या तरुणीचा चाकूने गळा चिरून हत्या करण्याची खळबळजनक घटना

Wakolla thugs the throat of the woman and threw it | वाकोल्यात तरुणीची गळा चिरून हत्या

वाकोल्यात तरुणीची गळा चिरून हत्या

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी एका अठरा वर्षांच्या तरुणीचा चाकूने गळा चिरून हत्या करण्याची खळबळजनक घटना वाकोला येथील मुंबई विद्यापीठाच्या मार्गावर घडली. हत्येनंतर पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला हल्लेखोर संभाजी मोरे याला स्थानिक रहिवाशी व वाहतूक पोलिसाने शिताफीने पकडले. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्येमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
मोरेच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणीचे नाव आयेशा शेख असून, दोघे एकाच परिसरात राहात होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संभाजी मोरे हा आयेशा हिच्यावर प्रेम करीत होता. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विद्यापीठ मार्गावर त्याने तिला अडविले. प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने त्याने तिला शिवीगाळ केली. तिच्या मोबाइलवर आलेले कॉल तपासण्यासाठी मोबाइल मागितला. मात्र, तिने त्याला नकार दिला. मोरेने आपल्याकडील चाकूने आयेशा हिचा गळ्यावर सपासप वार केले. ती रक्तबंगाळ होऊन पडल्यानंतर, त्याने पलायनाचा प्रयत्न केला. आयेशा हिच्या आरडाओरड्यामुळे स्थानिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. वाहतूक पोलिसाच्या मदतीने जमावाने त्याला पकडून चोप दिला. आयेशा हिला रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Wakolla thugs the throat of the woman and threw it