प्रतीक्षा दुसऱ्या यादीची

By Admin | Updated: June 26, 2015 02:41 IST2015-06-26T02:41:36+5:302015-06-26T02:41:36+5:30

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टमधील केवळ १ लाख १५ हजार १८८ विद्यार्थ्यांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी

Waiting second list | प्रतीक्षा दुसऱ्या यादीची

प्रतीक्षा दुसऱ्या यादीची

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या पहिल्या कट आॅफ लिस्टमधील केवळ १ लाख १५ हजार १८८ विद्यार्थ्यांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी प्रवेश कन्फर्म केले आहेत. त्यामुळे पहिल्या यादीतील १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म केले नसल्याने प्रवेशासाठी दुसऱ्या कट आॅफच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आशा मात्र बळावल्या आहेत. अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी कट आॅफ ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता लागणार आहे.
दरम्यान, प्रवेश कन्फर्म न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोठ्या संख्येने यंदा जागा रिक्त राहणार असल्याचे निदर्शनास येते. त्याचा अप्रत्यक्ष फायदा दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. रिक्त जागांची संख्या पाहता दुसऱ्या यादीनंतर सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोट्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवेश कन्फर्म झाले नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Waiting second list