वृद्धाश्रमातील वृद्धांना कुलदीपकांची प्रतीक्षा

By Admin | Updated: October 28, 2016 00:22 IST2016-10-28T00:22:58+5:302016-10-28T00:22:58+5:30

आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले,

Waiting for the Kuldeepaks to the elderly elderly | वृद्धाश्रमातील वृद्धांना कुलदीपकांची प्रतीक्षा

वृद्धाश्रमातील वृद्धांना कुलदीपकांची प्रतीक्षा

दिवाळीला घरी नेणार का ? : काळजाच्या तुकड्यांकडून हवाय वेळ
मोहन राऊत  धामणगाव रेल्वे
आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केले, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणती पणतीही दाखवीत नाहीत़ दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील का, अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे़
दिवाळीच्या उत्सवाला बुधवारी वसुबारसपासून सुरूवात झाली़ यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात़ जिल्ह्यात शासनाच्या अनुदानावर मोजके वृध्दाश्रम सुरळीतपणे सुरू आहे़ समाजाचे ऋण फेडावे स्वखर्चाने आठ वृध्दाश्रम जिल्ह्यात आहे़ दीपावलीच्या पार्श्वभूमिवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले, याची बेरीज,वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नाते संबंधातील प्रेम संपले आहे़ मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे़ पण आई-वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही, हेच आजची पिढी विसरली आहे़ या पिढीला पाहिजे ते शिक्षण, हवा तेवढा पैसा मिळत आहे़ मात्र आजची पिढी खोटी प्रतिष्ठा वंशाचे दिवे जपत आहे़

घराची लागलीय आस
तळहाताला चटके घेत त्यांना मोठे केले़ आज ते आम्हाला विसरले आहे़ त्यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवायची वेळ आणली आहे अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाचे दिवे लावतांना वृद्ध आई-वडिलांची आठवण होणार काय, चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे या गोष्टी ज्या जन्मदात्यांनी शिकविल्या त्या आई-वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे़ याचे काहीच वाटत नसेल काय दिवाळीसारख्या सणाला आपल्याला घराकडे न्यावे, अशी प्रतिक्रिया वृद्धांनी व्यक्त केली़

जुन्या आठवणींना उजाळा
एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याचे सांगून वंशाचा दिव्याची कथा विशद केली़ लहान पणी या कुलदीपकाला दिवाळीचे फटाके, फराळ, कपडे मिळावे म्हणून मी आपल्या जीवाचा आटा पिटा केला आज तोच मोठा झाल्यावर आम्हाला विसरला आहे़ दिवाळीसारख्या सणाला आम्हाला घरी नेण्यास दरवर्षी टाळले जाते़ आयुष्यातील संध्याकाळ साजरी करताना आपल्या कुटुंबांचा मुख्यत्वे मुलांचा आधार असावा लागतो़ मात्र वृद्धापकाळात आमच्या सारख्या आई-वडिलांना आश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़

कुलदीपक कधी देणार वेळ ?
वंशाच्या दिव्याला जन्म देताना आईला मोठ्या कळा सोसाव्या लागल्यात. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर याच कुलदीपकाच्या खाद्यांवर शेवटची विश्रांती यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांची असते. परंतु लग्न झाल्याबरोबर या कुलदीपकांनी आपल्याला आश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनीट आपल्याला भेटायला येते, अशी माहिती आता नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी दु:खाचे आश्रू पुसत जीवन जगावे लागत असल्याची कैफियत एका वृद्ध महिलेने मांडली़

Web Title: Waiting for the Kuldeepaks to the elderly elderly