शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाट दिसू दे गा देवा..! वाघ्या मुरळी लोककलावंतांच्या कामाला सुरुवात पण मानधनात घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 12:54 IST

वर्षभरात आषाढ महिना, नवरात्र महोत्सव, मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी आणि लग्नसराईला वाघ्या मुरळी कलावंतांचे गोंधळाचे कार्यक्रम असतात. 

अतुल चिंचली- पुणे: देवीचा गोंधळ, जागरण गोंधळ, धर्मजागरण, या द्वारे समाजसेवेचे कार्य करणारे वाघ्या मुरळी लोक कलावंतांच्या कामाला सुरुवात झाली. परंतु मानधनात मात्र घट झाली आहे. राज्यातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश या विभागातून या लोककलावंतांचे ३ हजार १०० संच आहेत. एका संचात पाच ते आठ याप्रमाणे १० ते १५ हजार लोककलावंत आहेत. 

संचारबंदीच्या काळात गोंधळाचे कार्यक्रम होऊ शकले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने सर्व गोष्टी चालू झाल्या आहेत. तसेच मंदिरे उघडल्याने धार्मिक विधींनाही सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने गोंधळीशी संवाद साधला. वर्षभरात आषाढ महिना, नवरात्र महोत्सव, मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी आणि लग्नसराईला वाघ्या मुरळी कलावंतांचे गोंधळाचे कार्यक्रम असतात. 

मुंबई विद्यापीठ शाहीर अमर शेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, लग्नसराईला सुरुवात झाली तरी वाघ्या मुरळी कलाकारांना बोलावण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या जागेअभावी या मंडळींच्या वावरण्यावर मर्यादा येत आहेत. लोक घाबरून या मंडळींना बोलवत नाहीत. त्यांच्या मनातून अजूनही कोरोनाची भीती गेली नाही. सध्याचा गोंधळाचा कार्यक्रम एक तासभरच चालतो. ..............................कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कलाकारांना शासकीय मदत मिळत आहे. कलाकारांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणीही झाली आहे. पण वाघ्या मुरळी लोककलावंतांचा त्याबाबत विचार केला जात नाही. एका संचात आठ ते दहा कलाकार असतात. आता कलाकार तेवढेच असून मानधनात घट झाली आहे. कार्यक्रमात मिळेल त्या मानधनात या कलावंतांना काम करावे लागत आहे. - राहुल पवार, सरचिटणीस, वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य .............................सध्या आठवड्यातून एखादे काम मिळत आहे. आमच्या संचात आठ लोक आहेत. कोरोनाच्या अगोदर एका कार्यक्रमाला १५ हजार मिळत असतील. तर आता ८ हजार मध्ये काम करावं लागते. यंदा अनेकांनी गोंधळाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. नवरात्र उत्सवाच्या मानधनावर पुढील चार महिन्याचा उदरनिर्वाह होतो. पण त्यातही ५० टक्के घट झाली आहे.      - राजेंद्र माळवे, गोंधळी .................................संचारबंदीत परिस्थिती फारच बिकट होती. आता कामाला सुरुवात झाली आहे. आठवड्यात दोन कामे मिळतात. आता मिळेल त्या मानधनात काम करावे लागते. गोंधळाच्या कार्यक्रमाला येताना पाच ऐवजी दोनच माणसे घेऊन या. असेही सांगितले जाते. पुढील वर्षापासून कामे मिळण्यास सुरुवात होईल.    - अनिल शिंदे; गोंधळी

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नKhandoba Yatraखंडोबा यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा