शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

प. महाराष्ट्र ओव्हरफ्लो, विदर्भ कोरडा; मोठे प्रकल्प ३ टक्केच भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:39 IST

मध्यम प्रकल्पात ४ टक्केच पाणी

- रूपेश उत्तरवार यवतमाळ : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात धुवांधार पाऊस बरसत आहे. या ठिकाणच्या धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहे.तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. याचवेळी मध्य विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस होत आहे. यामुळे या भागातील धरणे भरलेली नाही. राज्यातील ३२६७ धरणांतील या विसंगतीने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.सर्वाधिक वाईट स्थिती मराठवाडा आणि मध्य विदर्भातील प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत दोन महिन्यांनंतर १२.६२ टक्केच जलसाठा झाला. औरंगाबाद विभागातील ४५ प्रकल्पांत ३.०८ टक्के पाणी आहे. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत २२ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पांत ४.५८ टक्के पाणी संचय झाला आहे. अमरावती विभागातील ४११ लघु प्रकल्पांत ६.५२ टक्के जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ८६८ प्रकल्पात १.६१ टक्केच पाणी आहे. जलसाठ्याच्या या स्थितीमुळे भविष्यात रबीची लागवड करता येणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.३० लाख हेक्टरवरील उत्पन्न घटणारपावसाच्या असमानतेने पेरणी बाकी असलेल्या ३० लाख हेक्टरवरील क्षेत्रात शेतकऱ्यांनी ऐनवेळी नियोजन बदलले आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक लावायचे किंवा रबीतच लागवड करायची, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसणार आहे.मुठा नदी वाहिली दुथडीपुणे : शंभर टक्के भरलेल्या खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पानशेत धरणातून जवळपास तेरा हजार क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. परिणामी शनिवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राच्या दोनही बाजूचे रस्ते पाण्याखाली गेले होते.उजनीत १९ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत १९.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला. शनिवारी सायंकाळ नंतरही विसर्ग सुरु असल्याने, रविवारी पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ