गिधाड जनजागृती दिवस : महाराष्ट्रात उरले केवळ आठशे गिधाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:30 AM2020-09-05T04:30:53+5:302020-09-05T04:31:01+5:30

आधुनिक जटायूंच्या संवर्धनासाठी सरसावल्या स्वयंसेवी संस्था

Vulture Awareness Day: Only 800 vultures left in Maharashtra! | गिधाड जनजागृती दिवस : महाराष्ट्रात उरले केवळ आठशे गिधाड!

गिधाड जनजागृती दिवस : महाराष्ट्रात उरले केवळ आठशे गिधाड!

googlenewsNext

- संदीप आडनाईक
कोल्हापूर - मेलेले प्राणी खाऊन स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या देशात साधारण १९ हजार, तर राज्यात केवळ ८०० गिधाडे आहेत. त्यामुळे रामायणात सीतेला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणाºया गिध कुळातील जटायूला मिळालेला सन्मान आज पुन्हा मिळवून देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

१९९० ते २००९ या काळात जगभरात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाली. रॉयल सोसायटी आॅफ प्रोटेक्शन आॅफ बर्ड (इंग्लंड), पेरिग्रीन (इस्रायल), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (भारत) या संस्थांनी सर्वेक्षण केले. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्व्हेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ५ सप्टेंबर २००९ रोजी ‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस’ सुरू केला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. सचिन रानडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात १९ हजारांवर गिधाडे शिल्लक आहत. पांढºया पाठीची ६०००, लांब चोचीची १२,०००, तर पांढ-या गिधाडांची संख्या १००० पर्र्यंत उरली आहे.

‘सिस्केप’ या संस्थेचे प्रेमकुमार मेस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नागपूर आणि कोकणात गिधाडांची घरटी शिल्लक आहेत. यामध्ये पांढ-या पाठीची सुमारे ६०० आणि लांब चोचीची सुमारे २००, अशी सुमारे ८०० गिधाडांची संख्या नोंदविली गेली आहे.
महाराष्टÑात गिधाडांच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कोकणात काम करणारी ‘सिस्केप’, भाऊसाहेब काटदरे यांची ‘सह्याद्री निसर्गमित्र,’ अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया, नाशिकचे इको इको फाऊंडेशन, पुण्यातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम काम करीत आहेत.

जटायूला मिळालेला सन्मान पुन्हा मिळवून देण्याची गरज

जगभरात २३, भारतात नऊ प्रजाती
जगात गिधाडांच्या २३ आणि भारतात नऊ प्रजाती आढळतात. यामध्ये पांढºया पाठीची गिधाडे, लांब चोचीची गिधाडे, निमुळत्या चोचीची गिधाडे, इजिप्शियिन आणि युरेशियन ग्रिफन या गिधाडांचा समावेश आहे.

35-40वर्षे इतके गिधाडांचे आयुष्यमान असते. एक जोडी वर्षाला साधारण एक अंडे घालून त्या पिलाचा सांभाळ करते आणि त्यापैकी फक्त
50%पिले मोठी होतात.

गिधाडे नष्ट होण्याची कारणे : डायक्लेफिनॅक औषधाचा जनावरांसाठी
वापर, हरवलेला अधिवास, संसर्ग, पर्यावरणाचा ºहास, खाद्याची कमतरता आणि
मानवी हस्तक्षेप यामुळे गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
 

Web Title: Vulture Awareness Day: Only 800 vultures left in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.