नाशिकमध्ये दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का : तासाभरात बारा टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 16:57 IST2017-02-21T14:12:35+5:302017-02-21T16:57:32+5:30

दुपारी महिलावर्ग मोठ्या संख्येने घरातली कामे आटोपून बाहेर पडल्याने दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ३०.६३ वर पोहचला आहे.

Voting percentage increased after noon: 12 percent in hour | नाशिकमध्ये दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का : तासाभरात बारा टक्के

नाशिकमध्ये दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का : तासाभरात बारा टक्के

 

नाशिक : शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी महिलावर्ग मोठ्या संख्येने घरातली कामे आटोपून बाहेर पडल्याने दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ३०.६३ वर पोहचला आहे. साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान सुमारे १२ टक्के मतदान शहरात झाले. सकाळी पाच तासांत १९ टक्के इतके एकूण मतदान झाले होते.

Web Title: Voting percentage increased after noon: 12 percent in hour