नगरपरिषद निवडणुकांसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणी
By Admin | Updated: July 31, 2016 03:55 IST2016-07-31T03:55:39+5:302016-07-31T03:55:39+5:30
३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यात

नगरपरिषद निवडणुकांसाठी ३१ आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणी
कोल्हापूर : राज्यात डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या १९५ व १९ नवनिर्वाचित नगरपरिषदा व नगरपंचायतींचे सार्वत्रिक मतदान करण्यासाठी पात्र नागरिकांनी ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केले आहे.
सध्या निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार यादी शुद्धिकरण कार्यक्रम राबविला जात आहे.
त्याचे औचित्य साधून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्य
निवडणूक आयोगाने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात
जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर सर्व स्तरांवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, आपापल्या क्षेत्रातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणे
तसेच नागरिकांसाठी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या क्षेत्रांत आवश्यक तेवढे मतदार अर्ज स्वीकृती
केंद्र सुरू करण्याबाबतही
सूचना देण्यात आल्या आल्याची माहिती सहारिया यांनी दिली. (प्रतिनिधी)
>दुबार नावे वगळणार
दुबार नावे, स्थलांतरितांची नावे अथवा मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल. त्यासाठीच्या अर्जांचे नमुने मतदार नोेंदणी केंद्र, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मतदार म्हणून नाव नोंदणे - नमुना क्रमांक ६
मतदार यादीतील नाव वगळणे : नमुना क्रमांक ७
नाव व अन्य तपशिलांत दुरुस्ती - नमुना क्रमांक ८
मतदारसंघ अंतर्गत पत्ता बदलविणे - नमुना ८ अ