शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
5
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
6
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
7
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
8
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
9
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
10
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
11
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
12
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
13
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
14
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...
15
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
17
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
18
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
19
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
20
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 05:35 IST

नरेंद्र मोदी; शरदराव, तुम्ही तिथे शोभत नाही

लातूर : नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांना पक्की घरे मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले पहिले मतदान करा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत एका प्रकारे सैनिकांच्या नावानेच मते मागितली. पंतप्रधानांनी मंगळवारच्या सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुन्हा उल्लेख केला.

शरदराव़, तुम्ही कोणा लोकांसोबत उभे आहात? काँग्रेसकडून तर देशाला अपेक्षा नाहीत़, पण शरदराव तुम्हीसुद्धा? शरदराव तुम्हाला शोभून दिसते? असे सवाल करीत मोदी यांनी महाआघाडीवरून शरद पवारांवर उपरोधिक टोलेबाजी केली़ मोदींनी भाषणात दहशतवाद, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा जाहीरनामा व भाजप सरकारच्या योजनांवर विवेचन केले़ पाकिस्तानचे विमान पाडले यावर किती पुरावे द्यायचे? तुमच्या वीर जवानांवर तुम्हाला विश्वास नाही? देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांना परवाना देण्याचे काँग्रेसचे धोरण आहे़ त्यांनी देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा केलीच आहे़, असे मोदी म्हणाले.

आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, श्री सिद्धेश्वर, तसेच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा उद्घोष करून मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. भाषणाचा शेवटही मराठीत केला. ते म्हणाले की, काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व हिसकावले होते़ काँग्रेसने हिंमत दाखविली असती, तर फाळणी झालीच नसती अन् पाकिस्तानचा जन्मच झाला नसता. मध्य प्रदेशात नोटांची बंडले कोणाकडे निघाली? सहा महिन्यांच्या काळात अब्जावधी रुपयांची लूट कशी काय केली जाऊ शकते? हे जनतेला समजले आहे, असे सांगताना काँग्रेस इमानदारीने भ्रष्टाचार करते, असा आरोपही त्यांनी केला.

हातात हात घालून मंचावरमोदी आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून मंचावर आले. मोदींनी ठाकरेंना ‘छोटे भाई’ अशी साद घातली. भाजपच्या संकल्पपत्राचे उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. मात्र पाकिस्तानचा एकदाचा हिशेब करा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ठाकरेंचे संपूर्ण भाषण थोडे कौतुक,थोड्या अपेक्षा असे होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार