शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
4
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
5
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
6
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
7
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
8
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
9
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
10
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
11
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
12
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
13
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
14
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
15
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
16
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
17
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
18
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
19
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
20
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:36 IST

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाचा सर्व्हर खासगी व्यक्तीच्या हाती; विरोधकांचा आरोप, ‘मतदार यादी सुधारा; मगच निवडणुका घ्या,’  विरोधी पक्षांची आयोगाकडे मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मतदार यादीत गैरसोयीची नावे काढली जातात. यादीतील नावाबाबतचा गोंधळ समोर आला तर काही तासांतच ती नावे गायब केली जातात. विशेष म्हणजे याबाबत निवडणूक आयोगाला काहीच माहीत नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरा कुणी खासगी व्यक्ती चालवत आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांनी केला. यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका या पक्षांनी बुधवारीही मांडली.

विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन  मतदार यादीतील घोळांबाबतचे अनेक पुरावे यावेळी विरोधकांनी सादर केले. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह नोंदवले गेले. १२ ऑगस्टला दुपारी तीन वाजता आमच्या कार्यकर्त्यांनी तपासले तेव्हा ती नावे वेबसाइटवर होती; पण सहा वाजता ती नावे हटविण्यात आली. ही नावे कुणी काढली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत का, याची पडताळणी होण्याच्या आत ती कशी काढली गेली, असे प्रश्न आयोगाला विचारण्यात आले. मात्र त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हते. याचाच अर्थ निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी दुसराच चालवत असल्याचा गंभीर आरोप विरोध पक्षाच्या नेत्यांनी केला.

विरोधकांनी कायदा समजून घ्यावा : देवेंद्र फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी घेऊन भेटत आहेत. या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘विरोधकांनी किमान कायदा तरी समजून घ्यावा,’ असा टोला मारला आहे. सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या मुद्द्यांवर बोट ठेवत विरोधकांनी आयोगाकडे तक्रार केली. मात्र कोणत्या विषयाची तक्रार कोणाकडे करावी, हे माहिती नसल्यामुळे त्यांचा ‘फियास्को’ झाला. शरद पवारांना हे सर्व माहित असल्यामुळे ते बुधवारी विरोधकांबरोबर गेले नाहीत. विरोधक गोंधळात असल्यामुळे नॅरेटिव्ह सेट करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे, नाही तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. भाजपचे काही लोक मतदार यादीशी खेळताहेत. याबाबत विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी आयोगाला पत्र दिले होते; पण त्यावर काहीही झाले नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना

विधानसभा निवडणुकीत एका पक्षाने कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या, जी नावे सोयीची आहेत, ती हिरव्या पेनाने व गैरसोयीचे लाल पेनाने अधोरेखित करा. आम्ही आयोगाकडे तक्रार केली होती.- जयंत पाटील, नेते, शरद पवार गट

मतदार कसा गोपनीय असू शकतो? मतदार कोण आहेत हे आम्हाला कळायला नको? आयोग ही लपवाछपवी का करतो आहे? जिल्हा परिषदेच्या २०२२च्या याद्या फोटो आणि नावासकट आहेत, आता याद्या आल्या आहेत, त्यांत फक्त नावे आहेत.- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे 

राजुरात मतदार नोंदणीबाबत भाजप नेत्याच्या मोबाइलवर ओटीपी आला, तो कसा? तक्रारीनंतरही कारवाई नाही. आयोगाच्या वेबसाइटचे काम भाजपचा पदाधिकारी देवांग दवे करत होता.- विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's name with multiple IDs vanished; Election Commission unaware.

Web Summary : Opposition alleges voter list discrepancies. A woman's name, appearing with multiple EPIC numbers, disappeared from the website. Opposition parties claim the Election Commission is unaware, suggesting unauthorized server access. They demand voter list corrections before local elections.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूक 2024