विटावा स्कायवॉकचा खर्च २०.५८ कोटी

By Admin | Updated: September 22, 2016 03:30 IST2016-09-22T03:30:22+5:302016-09-22T03:30:22+5:30

विटावा ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत स्कायवॉक उभारण्याच्या कामाला अखेर सुमारे दोन वर्षांनंतर सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत.

Vitava SkyWalk costs 20.58 crores | विटावा स्कायवॉकचा खर्च २०.५८ कोटी

विटावा स्कायवॉकचा खर्च २०.५८ कोटी

अजित मांडके,

ठाणे- विटावा ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत स्कायवॉक उभारण्याच्या कामाला अखेर सुमारे दोन वर्षांनंतर सुरुवात होणार असल्याची चिन्हे आहेत. एमएमआरडीएने या कामासाठी २० कोटी ५८ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
कळवा-मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जेव्हा मंत्रीपद मिळाले होते, तेव्हा त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती दिली होती. त्या वेळेस त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांत या स्कायवॉकचे काम पूर्ण होणार होते. परंतु, दीड वर्ष उलटल्यानंतर आता खऱ्या अर्थाने या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे
दिसू लागली आहेत. विटावा ते ठाणे स्टेशन यायचे झाल्यास येथील रहिवाशांचा कमीतकमी २५ ते ३० रुपयांचा दिवसाचा खर्च कमी होणार आहे. येथून येणाऱ्या परिवहनच्या बसची संख्या कमी असल्याने येथील रहिवाशांना त्यामुळे शेअर रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सध्या चित्र आहे. रिक्षा पकडून कळवानाका, नंतर ठाणे स्टेशन गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळदेखील अधिकच खर्र्च होत आहे. परंतु, या स्कायवॉकमुळे येथील रहिवाशांचा किंवा प्रवाशांचा वेळ वाचणार असून अवघ्या तीन ते पाच मिनिटांत त्यांना पायी स्टेशन गाठता येणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि वाहतूककोंडीतून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे त्याचे काम सध्याच्या घडीला पूर्णत्वाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु, सुमारे दीड वर्ष या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता अखेर एमएमआरडीएने या कामासाठी आॅनलाइन निविदा काढल्या असून यासाठी २० कोटी ५८ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार, आता या निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या दोन महिन्यांत किंवा ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्याच्या कामाचा नारळ फुटेल, असे काहीसे चित्र आहे.
।भूमिपूजनानंतर दोन वर्षे
हा स्कायवॉक एका बाजूने कळवा आगार खाडी ते दुसऱ्या बाजूने सिडको खाडी असा दोन खाडीच्या प्रवाहांतून उभारला जाणार असून सुमारे ३ किमीचा तो असणार आहे. विशेष म्हणजे १४ डिसेंबर २०१४ रोजी या स्कायवॉकचे भूमिपूजन आव्हाडांच्या हस्ते झाले होते.

Web Title: Vitava SkyWalk costs 20.58 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.